Posts

Showing posts from May, 2018

ऐतिहासिक कालगणना अभ्यास

Image
ज्यांना थोड एतिहासिक कालगणनेचा अभ्यास करायचा आहे अश्यांसाठी ....  हिंदू तिथी, हिंदू संवत्सरे आणि इंग्रजी कालगणना ...... एक कल्प म्हणजे ब्रम्हदेवाचा एक दिवस. युगाब्ध ५२ म्हणजे ...

छत्रपती संभाजी महाराजांची हत्या आणि मनुस्मृती

Image
संभाजी महाराजांची हत्या आणि मनुस्मृती                                - बळवंतराव दळवी             संभाजी महाराजांची हत्या ...  होय हत्याच आणि तीही अमानुष हत्या औरंगजेबाने केली हे सर्वश्रुत आहेच...     आता संभाजी महाराजांच्या बलिदानाचा माझ्यासारखा एक सामान्य माणूस इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते की, आपल्या मराठी इतिहासात म्हणजे संभाजी महाराजांच्या समकाळातील इतिहासात आपल्या लोकांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल काहीच लिहून ठेवलेले नाही. जे लिखाण उपलब्ध आहे ते औरंगजेबाच्या दरबारातील खाफिखान ... साकी मुसैदखान .... ईश्वरदास नागर ... यासारख्या औरंगजेबाच्या पदरी असलेल्या लोकांनीच संभाजी महाराजांच्या अंतिम क्षणाबदल लिहून ठेवले आहे आणि आज ते उपलब्धही आहे. तुम्ही म्हणाल असं कसं चिटणीस बखर वैगरे मध्ये लिहिले आहे की ... तर मित्रांनो चिटणीस बखर ही मु...

शंभूचरित्रावर उडालेले शिंतोडे

Image
संभाजीराजे आणि कंठा  प्रकरण शंभूराजांच्या चरित्रावर उडालेले शिंतोडे  काहिही कारण असो, सत्य असो असत्य असो, पाप मग ते इतर कुणाचे असो......  इतिहासातील हे सर्व प्रकरण माथी मारायला छत्रपती संभाजी महाराज ही एकच व्यक्ती काहींना दिसते....! १ जून १६८१ च्या आसपास औरंगजेबाचा पुत्र अकबर हा हिंदवी स्वराज्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या आश्रयाला आला. संभाजीराजांना प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी अकबर आतुर झाला होता. पण संभाजीराजे त्याला भेटायला तातडीने गेले नाही.  जून- जुलै १६८१ च्या सुमारास संभाजीराजांवर विषप्रयोग करण्याचा अयशस्वी कट झाला होता. अकबराने या कटाची बातमी संभाजीराजांना दिली. यामुळे संभाजीराजांना अकबराविषयी विश्वासची खात्री पटली आणि त्यांनी अकबराची भेट घेण्याचे ठरवले. १३ नोव्हेंबर १६८१ रोजी संभाजीराजे आणि अकबर यांची पाली येथील पादशहापुर येथे भेट झाली. त्यानंतर पुन्हा १६८२ च्या ऑगस्ट मध्ये संभाजीराजे आणि अकबर यांची भेट झाली. या दोन भेटीत केव्हातरी संभाजीराजांनी अकबराला एक हत्ती आणि एक पोवळ्याची माळ भेट म्हणून दिलेली होती. अकबराच्या प्रत्येक हालचालीवर संभा...

रायगडावरील तोफा

Image
                 रायगडावरील तोफा                                 - बळवंतराव दळवी              वि.वा. जोशी यांचे १९२९ साली लिहिलेल्या 'राजधानी रायगड' या पुस्तकात रायगडावरील तोफांविषयी लिहिलेले आहे.  त्यांना १४ ते १५ तोफा आढळल्या होत्या. त्यानंतर १९६२ साली शा. वि. आवळस्कर यांच्या 'रायगडाची जीवनकथा' या पुस्तकात १७ तोफांविषयी जुजबी माहिती आहे. गो. नी. दांडेकर यांनी १९६५ साली लिहिलेल्या 'शिवतीर्थ रायगड' या पुस्तकात त्यांनी रायगडावरील १५ तोफांविषयी बरीच व्यवस्थित आणि विस्तृत माहिती लिहिलेली आहे. आज रायगडावर १५ तोफा दिसतात.  परंतु शिवकालात बहुत तोफा असल्या पाहिजेत. बहुधा त्यातील बऱ्याचशा इंग्रज आणि पोतुगीजांकडून घेतलेल्या असाव्यात. इंग्रज-पोतुगीजांकडील तोफा चांगल्या उत्तम घड...