शंभूचरित्रावर उडालेले शिंतोडे
संभाजीराजे आणि कंठा प्रकरण
शंभूराजांच्या चरित्रावर उडालेले शिंतोडे
शंभूराजांच्या चरित्रावर उडालेले शिंतोडे
काहिही कारण असो, सत्य असो असत्य असो, पाप मग ते इतर कुणाचे असो...... इतिहासातील हे सर्व प्रकरण माथी मारायला छत्रपती संभाजी महाराज ही एकच व्यक्ती काहींना दिसते....!
१ जून १६८१ च्या आसपास औरंगजेबाचा पुत्र अकबर हा हिंदवी स्वराज्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या आश्रयाला आला. संभाजीराजांना प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी अकबर आतुर झाला होता. पण संभाजीराजे त्याला भेटायला तातडीने गेले नाही. जून- जुलै १६८१ च्या सुमारास संभाजीराजांवर विषप्रयोग करण्याचा अयशस्वी कट झाला होता. अकबराने या कटाची बातमी संभाजीराजांना दिली. यामुळे संभाजीराजांना अकबराविषयी विश्वासची खात्री पटली आणि त्यांनी अकबराची भेट घेण्याचे ठरवले.
१३ नोव्हेंबर १६८१ रोजी संभाजीराजे आणि अकबर यांची पाली येथील पादशहापुर येथे भेट झाली. त्यानंतर पुन्हा १६८२ च्या ऑगस्ट मध्ये संभाजीराजे आणि अकबर यांची भेट झाली. या दोन भेटीत केव्हातरी संभाजीराजांनी अकबराला एक हत्ती आणि एक पोवळ्याची माळ भेट म्हणून दिलेली होती.
अकबराच्या प्रत्येक हालचालीवर संभाजीराजांचे बारीक लक्ष होते. अन एक बातमी आली.....
'एका हिंदू गायिकेला ( वेश्येला ) अकबराने मुसलमान करून आपल्याजवळ रखेली म्हणून ठेवले होते. संभाजीराजांनी दिलेली 'माळ' अकबराने त्या गायिकेला दिल्या.'
आपण भेट म्हणून दिलेली ती ' माळ' अकबराने एका रखेलीला दिल्याचे कळताच तो आपला अपमान आहे असे मानून संभाजीराजांनी अकबराला एक खरमरीत निरोप पाठवला "तुझ्या सन्मानासाठी मी तो कंठा तुला भेट दिला होता" यावर अकबराने उलट उत्तर पाठविले की, ' आम्ही बादशाहजादे आहोत. मनास येइल ते करु...' हे उत्तर ऐकताच संभाजीराजांनी अकबराच्या दिमतीला पाठवलेले घोडदळ आणि पायदळ परत बोलावले.

हा झाला ' कंठा प्रकरणाचा सत्य इतिहास' ....
पण काही लोकांनी हे प्रकरण शंभूराजांच्या माथी मारून हे सर्व प्रकरण शिवछत्रपती असताना घडले आणि तो भोसले घऱाण्याचा कंठा शंभूराजांनी नाचणारीला दिला आणि शंभूराजे कसे नाचगाण्यात मशगुल असत' असा खोटा इतिहास / कथा सांगण्याचा / लिहिण्याचे पाप केले.
या अश्या खोट्या कथा ऐकून आम्ही शंभूराजांच्या चरित्रावर उडालेले शिंतोडे आजवर पाहत आलो. पण 'सत्य बाहेर काढणे' हे शिवचरित्राचा अभ्यास करणाऱ्या माझ्या सारख्या शिवशंभू भक्ताचे कर्तव्य आहे. सर्वांसमोर हे सत्य मी मांडणार आहे. मला खात्री आहे माझ्या मराठमोळ्या हिंदू शिवभक्तांनाही हे सत्य समजेल आणि उमजेल .... आणि ते हे सत्य इतर शिवशंभू भक्तांपर्यंत पोहचवतील ...!!!
आपला शिवभक्त
बळवंतराव दळवी
======
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा.
शिवचरित्र आणि सह्याद्री
www.facebook.com/shivcharitranisahyadri
शिवचरित्र आणि सह्याद्री
www.facebook.com/shivcharitranisahyadri
बळवंतराव दळवींचे Youtube video पाहण्यासाठी
www.youtube.com/c/BalwantraoDalvi
www.youtube.com/c/BalwantraoDalvi
Copyright (c) 2016 All rights reserved.

This comment has been removed by the author.
ReplyDeleteदादा उत्तम लेख
ReplyDeleteखरच छान माहिती आणि लेख
ReplyDelete