रायगडावरील मंदिरे - मुर्त्या
'रायगडावरील मंदिरे मूर्ति' ----------------------- ----------- - बळवंतराव दळवी रायगडावरील शिर्काई मंदिर, जगदिश्वर मंदिर आणि कुशार्वत रामेश्वर मंदिर ही सगळ्यांनाच ठाऊक आहेत. आज आपण रायगडाच्या पायथ्यापासून गड चढत असताना अगदी जगदिश्वरापर्यंतअसणारी मंदिरे आणि मूर्ती कोठे कोठे आहेत त्या पाहूया. चला तर सुरुवात नाणे दरवाजापासूनच करुया ... चीत दरवाजाकडून रायगडवाडीकडे जाताना उजव्या हाताला एक पायवाट वर जाताना दिसते. हा मार्ग म्हणजे शिवकालीन राजमार्ग. याच वाटेने शिवछत्रपती कधी पालखीने तर कधी पायी उतरले आणि रायगड चढले असतील तो हा राजमार्ग. आज आपण मंदिरे आणि मूर्तीविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे रायगडावरील मार्गाची माहिती आपण पुन्हा पुढे पाहूच. नाना किंवा नाणे दरवाजाच्या पहिल्या कमानीच्या उजव्या बाजूला कानोड्यात हत्तीची मूर्ती आहे. डावीकडच्या कमानीत श्री मारुतीची सुबक मूर्ती आहे. मूर्ती विज्ञानानुसार ही मूर्ती वीर मारुतीची आहे. नाणे दरवाज...