असे शब्द आपल्या कानावर पडतात. अन अंग शहारुन जातं.. आपणही भानावर येतो.. दूर 

असे शब्द आपल्या कानावर पडतात. अन अंग शहारुन जातं.. आपणही भानावर येतो.. दूर ....


शिवतिर्थ रायगड - माझ्या आठवणी -भाग २


रायगडावर जाताना यंदा काय काय पहायचे असे ठरवून मी अनेकवेळा रायगडावर गेलो आहे. कधी रायगडावरील कड्यावर, बुरुजांवर, झाड़ाझुडपात पडलेल्या आणि मातीत गाडल्या गेलेल्या १५ तोफां शोधल्या. तर कधी गडावरील सुमारे ११ मोठे साठे तर जवळ जवळ लहान २५/३० पाण्याचे टाके शोधून त्याची नोंद ठेवली. तर कधी गडावरील देवता, मंदिरे आणि मुर्त्यांवर लिखाण केले.

कधी कधी शिवछत्रपतींच्या राहत्या वाडयाच्या पायरीवर तासनतास बसून शिवस्मरण केले आहे. पौर्णिमेच्या रात्री तर हां अनुभव खुप वेगळा भासतो. चंद्र डोक्यावर आला की शिवकालात हरवून जाऊन शब्द मूक होतात.

पौर्णिमेच्या रात्री बाजारपेठ मागे टाकून हत्ती तलावासमोरुन खाली उतरून पुन्हा महादरवाजाच्या देवड़ीवर बसून एक वेगळा अनुभव घ्यावा. शिवकाळात इथे महादरवाज्यावर दोन बर्कंदाज दिवसरात्र पहारा देत असे. त्यांच्या दोन्ही बंदुखा सतत भरलेल्या असे. पण हवेने बंदूक़ातील दारु सर्द होत असल्यामुळे दर आठवे दिवशी बंदुकितील बार उडवून दिला जाई. आपणही रात्रीच्या वेळी महादरवाजाच्या बुरुजांवर जाऊन मुकपणे त्या बर्कंदाजांना पहावे. आपले मन शिवकालात गेलेले असेल तर कानी शब्द पडतात,
"आवो, सिलेदारसाहेब !"
"काय हाय ?" देवड़ीवरचा मिश्यांचे झुपके आणि राकट पहारेकरी टप्पोरे डोळे रोखीत वळून आपल्याकडे पाहात असतो असेच आपल्याला वाटते....
"बोल की !"
"आज पुनवेची रात, तुमास्नी आपल्या राजाचा अभिषेक जाल्यावर गडावर आलेली ती हिरा आठवते काय ?"
"कोण ? मावळतीच्या कडा उतरून गेली होती तीच काय ?"
"व्हयं जी"
"आरं, आपल्या राजानं तिला लुगड़ं-चोळी देऊन कवतिक केलं होतं तीच "
"'हिरकणी बुरुज' असं त्या कडयाला महाराजांनी नाव दिलं व्हतं"
" त्या कोजागिरीच्या पुनवेराती गडावरचं घरन घर पाहिलं. आपले शिपाईगड़ी अवघा गड़ हिंडले होते. बाई गेली कुठं ?"
"सर्वांना मोठं आपरुक वाटलं होतं. आपलं राजं ते बी रातीच्या येळी त्या कड्यापाशी आलं व्हतं."
"दुसऱ्या दिवशी हिराला जिवंत उभी राहिलेली पाहून महाराज म्हणाले होते,
'मराठ्यांच्या मुलीसुध्दा जिवावरची धाडसं सहज करु शकतात ! अशा आयांचं दूध पिणाऱ्या मराठ्यांना जिंकायला खासा औरंगजेब जातीने आला, तरीही फत्ते आमचीच होईल !"

...

..

.

असे शब्द आपल्या कानावर पडतात. अन अंग शहारुन जातं.. आपणही भानावर येतो.. दूर टकमकाचा उभा कड़ा आपल्याकड़े पाहत सांगत असतो...
"बळवंतराव, रायगडाच्या मनातील गुजगोष्टी ऐकायला आणि समजायला तुम्हाला अश्या कितीतरी पौर्णिमा इथं पहाव्या लागतील."
...
..
.
.

                    - बळवंतराव दळवी

======

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा.
शिवचरित्र आणि सह्याद्री
www.facebook.com/shivcharitranisahyadri

बळवंतराव दळवींचे Youtube video पाहण्यासाठी
www.youtube.com/c/BalwantraoDalvi

Copyright (c) 2016 All rights reserved.

Comments

  1. खुप छान लिहिलंय दादा...!

    "मराठ्यांच्या मुलीसुध्दा जिवावरची धाडसं सहज करु शकतात ! अशा आयांचं दूध पिणाऱ्या मराठ्यांना जिंकायला खासा औरंगजेब जातीने आला, तरीही फत्ते आमचीच होईल !"
    👌👌👌
    अंगावर शहारे आले वाचुन...!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पौर्णिमेच्या रात्री रायगड प्रदक्षिणा

छत्रपती संभाजी महाराजांची हत्या आणि मनुस्मृती

रायगड असाही पहावा ....

ऐतिहासिक कालगणना अभ्यास

......असे अनेक अनुभव पाठीशी घेऊन रायगड भटकलो आहे ... कधी एकटा तर कधी फौजफाटा...! रायगडाचे नाव घेऊन डोळे बंद होताच सारं आठवतं...!!!