......असे अनेक अनुभव पाठीशी घेऊन रायगड भटकलो आहे ... कधी एकटा तर कधी फौजफाटा...! रायगडाचे नाव घेऊन डोळे बंद होताच सारं आठवतं...!!!

..... असे अनेक अनुभव पाठीशी घेऊन रायगड भटकलो आहे ... कधी एकटा तर कधी फौजफाटा...! रायगडाचे नाव घेऊन डोळे बंद होताच सारं आठवतं...!!!


शिवतिर्थ रायगड - माझ्या आठवणी -भाग १


रायगडाचे अन माझे नाते जुळले याला आता बराच काळ लोटला आहे. आणि त्यातल्या त्यात श्री शिवराज्यभिषेक म्हंटले की मी स्वतः गेले १५ वर्ष रायगडावर शिवराज्याभिषेकाला जात आहे . अन तिथली एक आठवण सांगवी तर मात्र महाकठिन. कारण गेल्या १७ वर्षात रायगडबददल एक आठवण सांगता येणार नाही , प्रत्येक वेळी नविन आठवण आहे रायगड़ाची......

रायगडावर मी अनेकवेळा बाजारपेठामागील अवकिरकरांकड़े मुक्काम केला आहे. शिवराज्याभिषेकाला पाऊस आणि शिवभक्तांची गर्दी जास्त असल्याने त्यांच्या गाईच्या गोठ्यात रात्र काढली आहे.

वर्ष नक्की आठवत नाही पण शिवराज्याभिषेकाच्या एकदिवस आधी सकाळीच आम्ही 35-40 जण त्याच ठिकाणी उतरलो . रायगड भटकून थोड़ा विसावा म्हणून पाठ टेकायला पुन्हा गोठ्यात सर्व आले. छताकड़े पाहत बराच वेळ तसाच पडून होतो, पुन्हा उठून मी आणि काही मोजके दहापांच डोस्कि माझ्यासोबत पुन्हा टकमकाकड़े निघालो. दारुकोठाराच्या आधी लागणारी घळ उतरून टकमकाच्या कड्याशी पोहचलो. टकमकाखाली ते छत्रनिजामपुर. पलीकडे तो काळनदीवरील धरण . कितीही वेळा हे दृष्य पाहिले तरी पहिल्यांदा पाहिल्यासारखं हे सर्व मला भासते. थोड्या वेळात पुन्हा परतलो.

बाजारपेठा पलीकडे पोहचतो न इतक्यात मला पाहताच आमच्यातील गोठ्यात राहिलेल्यापैकी लहान मुलं धावत माझ्यापर्यन्त पोहचली.
विचारलं ,
"काय झालं रे ?"
"काही नाही , साप ...."
"कुठे ?" अस म्हणतच मी गोठ्याकड़े धाव घेतली.
घरधनी हातात एक पिवळा धमक एक हातभर लांब असलेला साप घेऊन उभा होता.
त्याच्याकड़े विचारणा केली ,
"कुठे होता ?"
"काही नाही दादा, हे नेहमीचच आहे, मारला . आता तुम्ही निवांत झोंपा."
मुलांकडे पाहिल तर ती एकमेकांकड़े पाहत छान हसत होती.

मघाशी आम्ही गोठ्यातील ज्या छताखाली झोपलो होतो तिथेच आमच्या डोक्यावर तो साप एका फांदीला वेटोळे घालून बसला होता. काही छणापुरता सर्वांनाच ती एक पिवळी जाड वायर आहे असेच वाटत होते. मुलांनी इतरांची मस्करी करण्यासाठी त्या वायरीला साप साप म्हणत काठिने हलविण्याचा प्रयत्न केला होता. पण जेव्हा सापाने त्याची शेपटी हलवली तेव्हा मुलांनी गोठ्यातुन धूम ठोकली होती आणि घरधनीने येऊन त्या सापाला ठेचला होता....

आणि आता अवकिरकर आम्हाला सांगत होते... "काही नाही , नेहमीचच आहे, मारला आता झोपा निवांत...."

डोक्यावर साप, शेजारी लाकडांची भलीमोठी रास लागलेली .... आणि आम्ही निवांत झोपा...?
ठीकाय !

रात्री अविकरकरांकड़ेच पीठलं भाकर खाण्यासाठी रॉकेलच्या दोन दिव्याखाली आमची 35-40 डोकी घरासमोरिल पडवीत आणि काही दारापुढे बसलो. दुपारचा 'साप' विषय आजच्या पंगतीतला मुख्य विषय झाला होता.
जो तो आठवून आठवून एक एक गोष्ट सांगत होता.
अन आमच्या मधील महेश लोहार याने म्हंटले,
"अरे पायावरुन काही गेले रे !"
पुन्हा सर्वांचा हशा पिकला. अन त्याच्याच बाजुचा एक जण म्हंटला, "अरे माझ्याही पायाला काही स्पर्शुन गेल".
आता मात्र आवाज येवू लागले...,
"कोणी टॉर्च आणा रे !"
"इथे बत्ती घे रे !"
"या बाजूला मार टोर्च ".

अन टॉर्च त्या बाजूला मारला गेला ....

एक वितभर सापाचे पिल्लू त्या टोर्च मध्ये चकाकत दूर जाताना सर्वांना दिसला. आता मात्र कोणी काही बोलत नव्हते. बराच वेळ तसा गेला...
आमचा गलबला ऐकून घरधनी अविकरकर ताई बाहेर आली. माझ्याकड़े पाहत म्हणाली,
"भाऊ पाऊस हाय ना , आता हे बाहीर येतातच , तुमास्नी कोनाला चावला बिवला नाय ना ? बिनइशारी असतात, लय इचार करु नका".

असं बोलून ताई आत गेली...
अन मुलं पुन्हा एकमेकांकड़े पाहू लागली...

मग जो सर्वांचा हसण्याचा आवाज सुरु झाला तो आम्हाला रात्रभर जाग राहण्यास पुरला ..

असे अनेक अनुभव पाठीशी घेऊन रायगड भटकलो आहे ... कधी एकटा तर कधी फौजफाटा...!
रायगडाचे नाव घेऊन डोळे बंद होताच सारं आठवतं...!!!

                     - बळवंतराव दळवी

======

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा.
शिवचरित्र आणि सह्याद्री
www.facebook.com/shivcharitranisahyadri

बळवंतराव दळवींचे Youtube video पाहण्यासाठी
www.youtube.com/c/BalwantraoDalvi

Copyright (c) 2016 All rights reserved.

Comments

  1. राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसूर्यजाळ

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पौर्णिमेच्या रात्री रायगड प्रदक्षिणा

छत्रपती संभाजी महाराजांची हत्या आणि मनुस्मृती

रायगड असाही पहावा ....

ऐतिहासिक कालगणना अभ्यास