शिवछत्रपतींनी रायगडावर मशीद बांधली ?

किल्ले रायगड फिरत असताना मनात एक प्रश्न पडला....

रायगडावर मशिद ????



गेले १५ - २० वर्षे रायगड उभा आडवा फिरून झालोय. मला कुठेही रायगडावर मशिदीचे अवशेष सापडले नाहीत. पण काही जण बोंब मारत सुटलेत की गडावर शिवरायांनी मुसलमानांसाठी मशीद बांधली होती. आणि ती महामुर्ख लोक श्रीजगदिश्वर मंदिराकडे मशीद म्हणून बोट दाखवतात. पण याला कोणताच लेखी किंवा समकालीन पुरावा नाही हे ही तितकेच खरे !
आता आपण पाहू रायगडावर मशीद खरच होती की आणखी काही ...
आज रायगडावर नाणे दरवाजाच्या वरच्या बाजुस मदारमाची म्हणून एक टप्पा लागतो यालाच मदार मोर्चा असेही म्हणतात. काहीजण जाणीवपूर्वक याचा उल्लेख मशीदमोर्चा म्हणूनही करतात ( असा उल्लेख का करतात हे त्यांचे त्यांनाच ठाऊक ). या सपाटीवर पूर्वी नागिण, भवानी, धाकटी व लांडा कसाब नावाच्या तोफा होत्या.
रायगडावर नाणे दरवाजा मार्गे जाताना अगदी नाणे दरवाजा, अंधारी या ठिकाणी आजही खाबांवर श्री मारुतीची मूर्ती कोरलेली दिसते. मग मदार माची या टप्प्यावर एखादं शिवमंदिर अथवा मारूतीचे मंदिर असायला हवं . या जागेवर मध्येच माशिद कशी असू शकेल ? यावर तुम्ही म्हणाल की मारुतीरायाचं मंदिर कस काय असेल इथे ? असे म्हणण्यामागे ठोस कारणेही आहेत. त्या ठिकाणी जे अवशेष उरले आहेत त्यावर मंदिराला असलेले नक्षीकाम केलेले दगड आपल्याला दिसून येतात .... आणि 'शिवकालात एकांताच्या, गस्तीच्या ठिकाणी त्याकाळी मावळ्यांना भूत, पिशाच्च वैगरे पासून भिती नसावी म्हणून मारुतीरायाचे मंदिर बांधल जात असे.' ( आता त्याकाळी भूत पिशाच्च होते की नाही असा प्रश्न आज न विचारणेच योग्य होइल ) म्हणूनच शिवकालात इथं एखादं महादेवाचे किंवा मारुतीरायाचे मंदिर इथे असावं. दुसरे महत्वाचे कारण असे की, मंदीर लहानही असते ... पण मात्र मशीद मोठी असते . आणि तीही ऐसपैस असते पण इथे असलेले अवशेष पाहिल्यावर समजते की इथे एक द्वार असलेले मंदिर असायला हवे ... तशी बांधकामे आपल्याला सापडतात ....
१६८९ च्या नोव्हेंबर मध्ये छत्रपति संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा रायगड मोगलांकड़े आणि नंतर पुढे औरंग्या मेल्यावर १७०७ ला गड शिद्दीच्या ताब्यात देऊन मोगल परतले. याच काळात रायगडाचा किल्ले इस्लामगड' झाला.
आता एक प्रश्न असा पडतो की मोगलांनी आणि शिद्दीने किल्ले रायगडाचे नाव फक्त इस्लामगड केले की त्यावरील बांधकामालाही इस्लामी पद्धतीत बदलण्याचा प्रयत्न केला ? मोंगलांनी असे नक्कीच केले असावे. ज्या इतिकाद खानाने (जुल्फिकारखान) शिवसिंहासन मोडले तोडले ते गडावरील देवदेवतांच्या मदिरांची तोडफोड करणार नाहित काय ? आणि जर केले नाही तर मोगल आणि शिद्दी इतके कोमलहृदयी होते काय ? आजही आपण जेव्हा श्री श्रीजगदीश्वराच्या दर्शनाला जातो तेव्हा त्या मंदिराची आणि नंदीची तोड़फोड़ आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसू शकते.
इ.स. १७३३ ला रायगड पुन्हा हिंदवी स्वराज्यात संभाजी महाराजांचे पुत्र शाहूंकड़े आला. १७३४ ला शिद्दीने पुन्हा रायगड घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा 'मराठ्यांनी शिद्दीने वसवलेली मदार माचीवरील चौकी उधळून लावली आणि शिद्दीचे शिर कापले.'
त्यानंतर पेशवे उत्तर कालात १७८६ ला मदार कोठी म्हणून या जागेचा उल्लेख सापडतो. त्याकाळी कोठी याचा अर्थ उपयोगी वस्तू ठेवण्याची जागा !
रायगडावर शिवकाळात कधीच कोणतीही मशीद नव्हती. कारण शिवकालात असा एकही पुरावा सापडत नाही. उलट जगदिश्वर मंदिर आणि त्यासमोरील नंदिंची तोडफोड आपल्याला आजही पहायला मिळते.
उगाच पुरावे नसताना शिवरायांनी मशीद बांधली, मशीद बांधली अशी बोंब मारणारे यावर काहीच बोलत नाही. ते बाडगे हिंदू धर्माचे विरोधक यावर का गप्प बसतात ??? शिवछत्रपतींनी रायगडावर कोणतीही मशीद बांधलेली नाही हे अगदी स्पष्ट आहे. आणि जर कोणी म्हणत असेल की शिवरायांनी बांधली तर ठोस पुरावे द्या अन्यथा तुमची हिरवी तोंडं बंद करा !
देवाधर्मावर करूनी टिका |
मोगलांचे चाटता पाय ||
लाज धरा भाड्यानों |
तुम्ही लांडे झालात काय ??
- बळवंतराव दळवी
( शिवचरित्र अभ्यासक )
२० एप्रिल २०१५
टिप :- मुळ लेखकाच नाव न काढता लेख पसरवावा.



Comments

Popular posts from this blog

पौर्णिमेच्या रात्री रायगड प्रदक्षिणा

छत्रपती संभाजी महाराजांची हत्या आणि मनुस्मृती

रायगड असाही पहावा ....

ऐतिहासिक कालगणना अभ्यास

......असे अनेक अनुभव पाठीशी घेऊन रायगड भटकलो आहे ... कधी एकटा तर कधी फौजफाटा...! रायगडाचे नाव घेऊन डोळे बंद होताच सारं आठवतं...!!!