Posts

शिवछत्रपतींनी रायगडावर मशीद बांधली ?

Image
किल्ले रायगड फिरत असताना मनात एक प्रश्न पडला.... रायगडावर मशिद ???? गेले १५ - २० वर्षे रायगड उभा आडवा फिरून झालोय. मला कुठेही रायगडावर मशिदीचे अवशेष सापडले नाहीत . पण काही जण बोंब मारत सुटलेत की गडावर शिवरायांनी मुसलमानांसाठी मशीद बांधली होती. आणि ती महामुर्ख लोक श्रीजगदिश्वर मंदिराकडे मशीद म्हणून बोट दाखवतात. पण याला कोणताच लेखी किंवा समकालीन पुरावा नाही हे ही तितकेच खरे ! आता आपण पाहू रायगडावर मशीद खरच होती की आणखी काही ... आज रायगडावर नाणे दरवाजाच्या वरच्या बाजुस मदारमाची म्हणून एक टप्पा लागतो यालाच मदार मोर्चा असेही म्हणतात. काहीजण जाणीवपूर्वक याचा उल्लेख मशीदमोर्चा म्हणूनही करतात ( असा उल्लेख का करतात हे त्यांचे त्यांनाच ठाऊक ). या सपाटीवर पूर्वी नागिण, भवानी, धाकटी व लांडा कसाब नावाच्या तोफा होत्या. रायगडावर नाणे दरवाजा मार्गे जाताना अगदी नाणे दरवाजा, अंधारी या ठिकाणी आजही खाबांवर श्री मारुतीची मूर्ती कोरलेली दिसते. मग मदार माची या टप्प्यावर एखादं शिवमंदिर अथवा मारूतीचे मंदिर असायला हवं . या जागेवर मध्येच माशिद कशी असू शकेल ? यावर तुम्ही म्हणा...

अशी माहिती जी प्रत्येक मराठ्याने वाचायला हवीच !

Image
प्रत्येक मराठ्याने हे वाचायला हवंच ! आजचे मराठे शिवकाळातील मराठा सरदारांनी सांगितलेल, लिहिलेलं वाचत नाही, समजून घेत नाही हे दुर्दैव आहे ! कान्होजी जेधे म्हणजे शिवकाळातील एक मात्तबर सरदार घराणे. शहाजीराजांच्या सोबत अनेक लढाया लढलेले कान्होजी जेधे. शहाजीराजांच्या हुकुमावरून पुण्यात शिवछत्रपतींच्या सेवेत रुजु झालेल्या कान्होजी जेध्यांना कोण ओळखत नाही ? अफजलखानाच्या वेळी खानास मदत करा असा आदिलशाही फर्मान आलेला असतानाही शिवरायांच्या सोबत उभे राहून आदिलशाहीने दिलेल्या वतनावर पाणी सोडलेले मातब्बर सरदार म्हणून कान्होजी जेधे इतिहासात प्रसिद्ध आहेत. या जेध्यांच्या शिवकाळातील इतिहास प्रसिद्ध मराठा सरदाराच्या वंशपरंपरागत ऐतिहासिक नोंदी त्यांच्या जेधे शकावली व जेधे करिनात आहेत. अनेक ऐतिहासिक घटनांच्या सत्य नोंदी आपल्याला या शकावलीत सापडतात इतके हे महत्वाचे साधन. या मराठा सरदाराच्या ऐतिहासिक नोंदवहीत शिवछत्रपतींच्या जन्माची नोंद लिहिलेली आहे. ती नोंद अशी शके १५५१ शुक्ल संवत्सरे, फाल्गुन वद्य तृतीया  या हिंदू कालगणनेनुसारच ही नोंद आहे. माझ्यासारख्या सामान्य मराठा तरुण मनात विचार येत...

१९ फेब्रुवारीची शिवजयंती आणि महात्मा फुले

Image
महात्मा फुले आणि १९ फेब्रुवारीची शिवजयंती       ज्यांना शिवभारतावर विश्वास नाही, जे जेधे शकावली मानत नाही पण जे महात्मा जोतिराव फुलेंना मानतात त्यांच्यासाठीच हा छोटा लेख मांडत आहे. लेख पूर्ण वाचूनच आपले मत मांडावे ही नम्र विनंती राहिल. आज अनेक जण इंग्रजी तारखेनुसार श्रीशिवछत्रपतींची जयंती साजरी करताना १९ फेब्रुवारीला पहिल्यांदा शिवजयंती साजरी करणारे म्हणून महात्मा फुलेंचा उल्लेख करतात . आणि हे पटवून देण्याकरिता एका चित्रपटातील video दाखवला जातो त्यात महात्मा फुलेंनी १९ फेब्रुवारी १८६९ ला पहिली शिवजयंती साजरी केल्याचं दाखवलं, सांगितले जातं. पण ..... आता स्वतः महात्मा जोतिराव फुले त्यांनी शिवछत्रपतींवर लिहिलेल्या पोवाड्यात काय लिहितात हे पाहू .... पंधराशे एकूण पन्नास साल फळलें जुन्नर ते उदयांशी आले | शिवनेरी किल्ल्यांमध्यें बाळ शिवाजी जन्मलें जिजीबाइस रत्न सापडलें || १८६९ साली लिहोलेल्या या पोवाड्यात महात्मा फुले शिवजन्माचा उल्लेख करतात तो १५४९ चा. इथे १५४९ हे शिवजन्माचे इंग्रजी साल नसून ते शालिवाहन शके १५४९ या शिवजन्माच्या हिंदू तिथीचे वर्ष आहे  . आणि...

मी शिवाजी आहे !

Image
.... मी शिवाजी आहे ! .. . आग्ऱ्याच्या दरबारात सह्याद्रीचा सिंह गरजला,       "रामसिंह तुम्हें मालूम है, तुम्हारे पिताजीको भी मालूम है, और तुम्हारा बादशाह भी अच्छी तरहसे जानता है कि ...

गडावर भेटणारा तो अनोळखी गडी

Image
...... आणि तो दुर एका घराशेजारी दिसला. आमच्याच बसकडे पाहत होता.... म्हणत होता, " ओळख ठेवा !"        गडावर भेटणारा तो अनोळखी गडी        --------------------------------------------                              - बळवंतराव दळवी         ओळख नाही पाळख नाही, न त्याला आपण स्वतःहून गडकिल्ल्यावर जातानाचा संदेश दिला असतो. पण जणू आपण गडावर येणार हे त्याला आधीच कोणी सांगितलेलं ! कधी तो फार पुढे तर कधी वाट बघत दुरुन आपल्याकडे लक्ष ठेवू असतो. आपण थोडा विसावा घेतो. तो लगेच आपल्या जवळ येतो. आपल्याकडे पाहतो. जणू म्हणत असतो, "चाला बिगीन बिगीन लैय चढ हाय अजून." तो पुढे असल्याने आपल्याला मार्ग चुकण्याची भिती नसते. आपण ढसाढसा पाणी ढोसतो. त्याला मात्र गड चढायच्या मार्गात एकदाही पाणी पिताना मी पाहिले नाही. किल्ले रायगडावर तर अगदी पाचाडपासून गडावरच्या धर्मशाळेत पोहचते करण...

रायगड असाही पहावा ....

Image
.    रायगड असाही पहावा .... ....असे अगणित क्षण ज्या गडाने पाहिले .. जो या अमुल्य इतिहासाचा भाग आहे .. नाही तो अविभाज्य घटना आहे ... असा हा रायगड ...                           - बळवंतराव दळवी  ...

रायगडावरील चोर दिंडी आणि आम्ही

Image
रायगडावरील 'चोर दिंडी'  या आधीही मी पाहिली होती पण ती महादरवाज्यातून टकमकाकडे येणाऱ्या तटबंदी मार्गाने. पण हे असं पहिल्यांदा अनुभवत होतो ......              रायगडावरील चोरदिंडी ...